व्यापारी बँक म्हणजे काय|व्यापारी बँक कार्य सविस्तर माहिती|commercial bank information in marathi

 व्यापारी बँक

एकविसावे शतक जगातिल प्रत्येक ठिकाणी मध्ये अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास हा शब्द महत्त्वाचा ठरला गेला आहे अर्थव्यवस्थेचा विकास व्यापारी बँकेमध्ये सिंहाचा वाटा आढळून आलेला आहे 1991 नंतर भारताने खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण धोरणाचा स्वीकार केला त्यावेळेस व्यापारी बँकेच्या कार्यामध्ये खूपच वाढ झालेली आढळून आले.

   आर्थिक मंदीमुळे काही बँका मंदी ग्रस्त झालेल्या आढळून आल्यात पण आपल्या या मंदीच्या संकटातून भारतीय व्यापारी बँका सहीसलामत बाहेर पडलेल्या आढळून आलेले आहेत या बँका सक्षमपणे कार्यरत आहेत.

व्यापारी बँक म्हणजे काय|व्यापारी बँक कार्य सविस्तर माहिती|Commercial Bank Information In Marathi


 व्यापारी बँक म्हणजे काय|व्यापारी बँक कार्य सविस्तर माहिती|Commercial Bank Information In Marathi

 व्यापारी बँक म्हणजे काय -whats  this commercial Bank 

  बँक म्हणजे अशी व्यक्ती की आपल्या दररोजच्या व्यवहारात ग्राहकांकडून चालू खात्यावरती पैसे स्वीकारले व त्यांनी काढलेल्या आदेशावर ती पैसे देते

   आपसातील देण्याघेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी ही संस्था काम करते तिला बँक म्हणतात

व्यापारी बँक कार्य 

 व्यापारी बँकांची कार्य प्रमुख तीन प्रकारचे आहेत

  सध्याच्या काळामध्ये भारतात व्यापारी बँका शेती उद्योग सेवा शिक्षण व्यापार पर्यटन विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य आपलं काम बजावत आहेत.


 1 )प्राथमिक कार्य प्रायमरी फंक्शन primary function

2) दुय्यम कार्य( secondary function)

3) सामाजिक कार्य ( social function )


 आपण कार्याची सविस्तर माहिती घेऊ

1)प्राथमिक कार्य प्रायमरी फंक्शन primary function

 यामध्ये आपल्या सभासदांकडून ठेवी स्वीकारणे कर्ज देणे पैशाची निर्मिती करणे बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे.


1)ठेवी स्विकारणे -(Accepting Deposits)

   या बँकेचे अतिशय महत्त्वाचे कार्य म्हणजे सभासदांकडून खातेदारांना कडून ठेवी स्वीकारणे होय या ठेवींवर अल्प दराने व्याज देणे हे आहे.


  अ )चालू खाते -current Account

   उद्योग व्यापार व्यवसाय लोकांना नेहमीच बँकिंग व्यवहार पूर्ण करण्यासाठी चालू खाते अतिशय महत्त्वाचा आहे.


ब )बचत खाते Saving Account

 अल्प व मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांचा लहान प्रमाणावरील बचती गोळा करण्यासाठी हे खाते चालवलं जातं या खात्यावरील शिल्लक रकमेवर सर्वसाधारणपणे तीन ते पाच टक्के दराने व्याज सभासद खातेदारांना दिलं जातं आठवड्यातून दोन वेळा पैसे काढण्याची परवानगी दिली जाते खात्यावरील पैसे काढण्यासाठी मागणी पत्र धनादेश किंवा एटीएम याचा वापर केला जातो


क )मुदत ठेव fixed Deposit Account

 या खात्यावर ती सर्वसाधारणपणे तीन महिने ते पाच वर्ष किंवा दहा वर्ष मुदतीसाठी ठेवू स्वीकारल्या जातात या ठेवी वरती सात ते दहा टक्के दराने व्याज दिले जात मुदत संपल्यानंतर व्याजासह ठेव परत दिली जाते. जर मुदतीपूर्वी ठेव परत आपल्याला घ्यायचे असेल तर व्याजदर कमी केला जातो.


 ड )आवर्ती ठेव recurring deposit

 सामान्यता या प्रकारचे खाते पगारदार किरकोळ व्यापारी फिरते विक्रेते रोजंदारीवरील कारागीर इत्यादींना उपयुक्त असतं या खात्यात विशिष्ट मुदतीत करता येत 3,5,7 दहा वर्षे मदतीकरिता खाते सुरू करता येते या खात्यावर ती जास्तीत जास्त एक लाख रुपये ठेव म्हणून ठेवता येते.


 इ )इतर ठेवी खाते other deposit accounts  

  समाजातील गरीब व दारिद्य्र रेषेखालील लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून व्यापारी बँका विविध प्रकारची ठेवी उदाहरण. पिग्मी ठेव, शुभमंगल ठेव, शैक्षणिक ठेव,लखपती ठेव,इत्यादी ठेवी स्वीकारत असतात या टीव्हीवर ते आकर्षक व्याजदर दिला जातो.


 2)कर्ज देणे lending money advance

 व्यापारी बँक आपल्या कार्यक्षेत्रातून मिळालेली रक्कम आहे पैसा आहे ते भागातील विभागातील लघुउद्योजक असतील कारखानदार असतील व्यवसायिक व्यापारी शेतकरी शेतमजूर पगारदार व्यक्ती वित्तीय संस्था महामंडळे यांना अल्प मध्यम व दीर्घ मुदतीसाठी विशिष्ट अटी वरती कर्जाऊ रक्कम प्रदान करतात यामध्ये रोख कर्ज अधिकर्ष सवलत अल्पमुदत कर्ज कर्ज देतात


 अ )कर्ज loans

 भारतातील व्यापारी बँका विविध कंपन्यांचे शेअर्स सरकारी कर्जरोखे विकास सर ओके चल चल मालमत्ता इत्यादींच्या तर नावावरती योग्य व्यक्तीस विशिष्ट करण्यासाठी विशिष्ट कालावधीसाठी ठराविक रक्कम कर्ज म्हणून देते

 कर्ज साधारणतः तारण वस्तूच्या 70 ते 80 टक्के पर्यंत मंजूर केले जातो.

 1)रोख कर्ज-

 सर्वसाधारण शेतकरी सभासद व्यापारी उद्योजक व्यावसायिक इत्यादींना खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी तारण मालावर तारुण्याच्या 50 ते 75 टक्के रोख रक्कम कर्ज म्हणून दिलं जातं या कर्जाचा विनियोग गरजेनुसार करता येतो फक्त वापरलेल्या कर्जावर ती व्याज द्यावे लागते.

 2)अधिकर्ष सवलत - overdraft facility


 व्यापारी बँकांकडे चालू खाते असलेल्या योग्य व पात्र खातेदारांना अधिक खर्च सवलतीचा फायदा घेता येतो शेअर्स व कर्जरोखे विमा पॉलिसी विकास व रोखे किंवा वैयक्तिक पतीवर तीही कर्ज मंजूर केले जातात ही अल्प मुदत काळासाठी ही कर्ज असते त्याच्यावर ती व्याज आकारणी केली जाते.


 3)हुंडी स्वीकारणे व वटविणे expecting and discounting bills and exchange


 व्यापारी बँका आपल्या सभासदांना हुंडी स्वीकारून अल्प मुदतीसाठी नव्वद दिवस पैशांची गरज भागविण्यासाठी या प्रकारचे कर्ज देतात उद्योग व्यापार असे बरेच व्यवहार उधारीवर व विश्वासावर चालत असतात यामध्ये उत्पादक कच्चामाल उधारीवर पुरवत असतात घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्यांना उधारीवर येत असतात या सर्व व्यवहारांना आम्ही म्हणून ऋणको हुंडी काढले जाते.


 4)इतर कर्ज other loans

 व्यापारी बँक आपल्या खातेदारांना आत्ताच या काळामध्ये घरबांधणी वाहन खरेदी शैक्षणिक कारणाकरिता पर्यटनासाठी प्लॉट खरेदी साठी कर्ज दिले जात या कर्जावर ती आकर्षक व्याजदर आकारला जातो हे कर्ज पगार पत्र घर जमीन जमीन शेअर्स बचतीची ठेवी तारणावर ते दिला जातो


 5)पत पैशाची निर्मिती

 सध्याच्या काळामध्ये फक्त पैशाची निर्मिती करणं हे व्यापारी बँकेचे प्रमुख कार्य मानला जातो शेती उद्योग व्यापार सेवा जलद गतीने विकास घडवून आणण्याचे प्रभावी साधन म्हणून पैसा निर्मितीला कार्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. 2)दुय्यम कार्य

 आजच्या काळामध्ये व्यक्ती समाज अर्थव्यवस्था व भांडवली बाजारामध्ये कार्य पार पडले जातात

अ )प्रतिनिधी कार्य/Agency Sarvices

  व्यापारी बँक यांना खातेदाराचा प्रतिनिधी म्हणून कार्य पारं पाडावी लागतात.

1) चेक ड्रॉप्स हुंडी वचनचिठ्ठी इत्यादीने पैसे वसूल करणे

2) नियमित शोधन करणे

3) ग्राहकांच्या वतीने रक्कम जमा करणे

4) शेअर्स कर्जरोख्यांची खरेदी विक्री करणे

5) रक्कम हस्तांतरण करणे

6) ग्राहकांचे विश्वस्त म्हणून कार्य करणे

7) ग्राहकांचा प्रतिनिधी म्हणून विविध कर भरणे

8) ग्राहकांना गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणे

9) ग्राहकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ची खरेदी करून देणे

10) प्राप्तिकर विवरणपत्र भरणे

11) रेल्वे विमान पंचतारांकित हॉटेल्स पर्यटन केंद्रे इत्यादी आरक्षण करणे.


उपयुक्त कार्ये सेवा कार्य

 आधुनिक काळामध्ये उत्पादक उपभोक्ते उद्योजक ग्राहक व्यापारी व्यवसाय की त्यांना विविध प्रकारचे सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्यांना उपयुक्त याचिका या नावाने संबोधले जाते


1) मूल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे

2) प्रवासी चेक सुविधा उपलब्ध करून देणे

3) हमी पत्र देणे

4) भाग विमेकरीचे कार्य करणे

5) विदेशी व्यापारात मदत करणे

6) सांख्यिकी आकडेवारी गोळा करणे

7) विदेशी विनिमयाचे व्यवहार करणे

8) गुंतवणुकीबाबत ग्राहकांना तज्ञ सेवा पुरविणे

9) ग्राहक जागृती अभियान घडवून आणणे

10) ग्राहकांना भांडवल बाजार पारस्परिक निधी बचत माहिती देणे3) सामाजिक कार्य social functions

 व्यापारी बँक आर्थिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी वृद्धीचा अभिकर्ता यांना त्यांना आपलं काम पूर्ण करतं ते काम कोण कोणता आहे ते आपण खालील प्रमाणात पाहूयात.


1) आर्थिक वाढीचा एजंट म्हणून कार्य करणे

2) भांडवल निर्मितीचा वेग वाढविणे

3) आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे

4) समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सहाय्य करणे.

5) स्वयंरोजगार वृद्धीस चालना देणे.

6) सामाजिक व शैक्षणिक संस्थांना मदत करणे.


 व्यापारी बँका वरील प्रमाणे कार्य करत असतात 1991 नंतर भारताने नवे आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर नरसिंह समितीच्या शिफारशीनंतर एकविसाव्या शतकात विणकाम मध्ये नवीन संधी आव्हाने स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर ती निर्माण झालेले आहेत त्यामुळे अंकात लक्षणीय बदल झालेले आढळून आले.
 


  

 

  

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने