बँक वर मराठी निबंध |बँक म्हणजे काय |बँकेचे कार्य कोणती|Banking information in Marathi

 आधुनिक काळामध्ये आर्थिक व्यवहार हे पैसे आणि पैसे याभोवतीच केंद्रीत झालेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे पैसा या घटकाला अर्थव्यवस्थेचा एक साधरण महत्व प्राप्त झालेले आपण पाहताना दिसतोय. अर्थव्यवस्थेमध्ये बॅंका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात विकसीत आणि विकसनशील अर्थव्यवस्था मध्ये आढळून येतं की बचत करणाऱ्या व्यक्ती ह्या गुंतवणूक करतात असं नाही किंवा गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती फक्त बचत करतात असं नाही तर त्यामध्ये उत्पादन आणि गुंतवणूक यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी बँका हे आपलं कार्य करताना दिसतात त्यामुळे बँका या अर्थव्यवस्था आधुनिक आधारस्तंभ  आपल्याला दिसून येतेयं.

बँक म्हणजे काय |बँक |बँकेचे कार्य कोणती|Banking information in Marathi


बँकिंग म्हणजे काय त्यांची कार्य कोणकोणती आहेत हे आपण आज पाहणार आहोत.

    बँक नफा य अधिक भर देणारे बँक असते त्यामुळे बॅंका ठेवी स्वीकारणे कर्ज देणे प्रतिनिधी म्हणून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच बरोबर विविध लोन देणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात.


बँक म्हणजे काय |बँक |बँकेचे कार्य कोणती|Banking information in Marathi


     बँक म्हणजे काय -Bank Mahnje Kay 

  पैशाची देवाणघेवाण करणे सरळ साधा सोपा अर्थ बँक असा होतो.

प्रा. शेयर्स व्याख्या -

    संस्थांची किंवा व्यक्तींची कर्ज फेडण्यासाठी सहज मान्य केले जाणारे संस्था म्हणजे बँका होय.

    गिलबर्ट

   बँक चालक किंवा बँकर हा पैसे घेणारा आणि पैसे कर्जाऊं देणारा या दोहोतील मद्यस्थ म्हणून कार्य करतो.बँकेचे कार्य काय आहेत|Banking working 

 1)मुख्य कार्य |प्राथमिक स्वरूपाची कार्य कामे.


1)ठेवी स्विकारणे-

    बँका आपल्या व्यवसायाचा एक आवश्यक भाग म्हणून ग्राहकांचा ठेवी घेतात.निरनिराळ्या प्रकारच्या ग्राहकांना स्वीकृती ठेवींचे प्रकार आपण करणार आहोत चार प्रकारच्या ठेवी बँका स्वीकारत असतात.

1)चालू ठेवी -

    चालू  खात्यातील ग्राहकाला चालू ठेव इच्छेनुसार बँकेला कोणतीही सूचना न देता परत मागता येतात. मोठमोठे व्यापाऱ्यांचे नेहमी मोठ्या प्रमाणावर ती पैशांचे व्यवहार होत असतात त्या वेळी  लोक चालू खाते उघडतात व्यापारी लोक या खात्यातून दररोज पैशांची देवाण-घेवाण याचे व्यवहार शक्य होतात तसेच पैसा सुरक्षित राहतो आवश्यकतेनुसार केव्हाही कधीही आपण वापरू शकतो.

 2)बचत ठेवी

 सर्वसामान्य लोकांना बचतीची काटकसरीची सवय लागावी म्हणून अशा प्रकारच्या खात्यात ठेवीदारांना पैसे केव्हाही कितीही वेळा काढता येतील यावर ती बंधन नसतं. पण आपल्याला काढायची रक्कम जर मोठी असेल तर बँकेला पूर्वसूचना देणे गरजेचे असतात.

3)मुदत ठेवी -

  या ठेवी मध्ये विशिष्ट रक्कम विशिष्ट मुदतीसाठी कायम ठेवली जाते. मुदत संपल्यानंतर व्याजासह एकूण रक्कम ग्राहकांना एकरकमी परत करावे लागते मुदत ठेवी तील पैसा सामान्यपणे मुदत संपल्या शिवाय काढता येत नाही. क

पैसा  सामान्यपणे लाभदायक गुंतवणुकीसाठी वापरू शकतात ठेवीची मुदत जितकी जास्त असतील तितकाच व्याजदर जास्त देऊन बँक ठेवी स्वीकारताना आपल्याला आढळतात. आपल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर मुदत ठेव पावती सादर केल्यावरती आपल्याला पैसा व्याजासह परत केला जातो.


4)आवर्त ठेवी -

ही योजना नियमितपणे दरमहा  नियमित पणे थोडी थोडी बचत करून मदती अखेर एकरकमी पैसा देणारी ही आवर्त ठेव योजना हे ग्राहकाला पाच वर्षात दुप्पट पैसे झाल्याने एकरकमी मुबलक पैसा हाती पडल्याने आवर्त ठेवतील पैसा अतिशय सुरक्षित  वापरता येतो.


2) कर्ज देणे

 प्रत्येक बँक आपल्या ग्राहकांना शक्य तो अल्प मुदतीचे कर्ज देतात कारण आपले भांडवल प्रामुख्याने मागणी करता क्षणी परत करण्याच्या अटींवर स्वीकारलेल्या ठेवींसाठी असतं म्हणून हे अल्प भांडवल पुरवल्या जातात..

अ )रोख कर्ज 

  सर्वच बँक कर्ज दिला जातो जो कर्ज घेणारा इच्छुक व्यक्ती आहे त्यांच्याकडे तारण घेऊन बँकेकडे जातं. बँकेची तारण विषयाची खात्री करून देऊन तारण पुरेसं व विश्वासाचा आहे अशी बँकेचे जर खात्री झाली तर कर्जदाराचा कर्ज लगेच मंजूर केल जातो कर्जदाराच्या नावे बँकेत खाते उघडण्यात येऊन मंजूर करण्यात आलेली रक्कम त्वरित खात्यात जमा केले जाते आणि त्या व्यक्तीला एक चेक बुक दिल जात.

ब )अधीकर्ष सवलत

 हे कर्ज देण्यासाठी खातेदाराला त्यांच्या खात्यामध्ये असलेल्या रकमेपेक्षा गरजेनुसार अधिक रक्कम काढण्यासाठी परवानगी दिली जाते. खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्तीत जास्त किती रक्कम काढायची हे बँक ठरवते खातेदाराने जेवढी रक्कम वापरली आहे तेवढ्याच रकमेवर बँक व्याज आकारते.


क )मुदतीचे कर्ज -

 कर्ज सुद्धा मंजूर केली जातात.बहुधा कर्जही अल्पमुदतीची असतात अल्पमुदत ही एक ते तीन वर्षाकरता मध्यम मुदत ही तीन ते पाच वर्षासाठी असतं आणि दीर्घ मुदत कर्ज ही बँक दिल्या जातात दीर्घ काळ कर्ज दिल्यामुळे पैसा बराच वेळ बाहेर गुंतून राहतो त्यामुळे उत्पादन कार्यासाठी पैसा वापरता आला तरच उत्पादन  यशस्वी होतं असं म्हटलं जातं.

 3)बिले वटविणे -

  बिले वटविणे बँकाचा अतिशय महत्त्वाचं काम असतं. सामान्यपणे दिवसाच्या आत मध्ये ही रक्कम पूर्णपणे भरावी लागते.


 3)दुय्यम स्वरूपाचे कार्य( सेकंडरी फंक्शन्स ऑफ बँक ) secondary functions of bank

 खातेदाराला हस्तक म्हणून कार्य करणे मतदानाचा प्रतिनिधी मधून काही बँका कार्य करतात खातेदाराची येणी वसूल करून देणे देणे येणे करता खातेदाराला खंड घराचे, भाडे भांडवलावरील व्याज भागभांडवल आवरी लाभांश आणि नफा या रुपाने मिळणारे उत्पन्न वसूल करणे. उदाहरणार्थ विम्याचे हप्ते घराचे भाडे घराची घरपट्टी पाणीपट्टी भरणे देणी देणे होय.

 4)विश्वस्त म्हणून कार्य करणे -

 एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर मालमत्तेचा सांभाळ करण्याची जबाबदारी विश्वस्त म्हणून सोपवते बँका मृत व्यक्तीची मालमत्ता त्यांची मुले सज्ञान होईपर्यंत सांभाळ करतात मुले सज्ञान झाल्यानंतर मालमत्तेचे मुलांकडे हस्तांतरण केलं जातं यामध्ये बँकांना सेवा शुल्क आणि कमिशन मिळत जातो.

 5)पैसे  पाठविणे

 आपण पाहतो की पूर्वी पोस्टमध्ये मनीऑर्डर पाठवले जाईल ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी  पाठवता यायची त्याचप्रमाणे बँक मध्ये एका बँकेतून पैसे दुसरे ठिकाणी चेक डिमांड ड्राफ्ट ट्रान्सफर टेलिग्राफ इत्यादी साधनांच्या माध्यमातून अल्प कमिशन करून पाठवण्याचे काम बँका करतात. व्यवहाराची गतिशीलता यातून आढळून येते.


 6)ग्राहकांचा आर्थिक हवाला घेणे(ReFerence )

 एखाद्या व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करायचे असतील तर त्या बँक आपल्या व्यापाऱ्याला हमीपत्र देऊन आंतरराष्ट्रीय बाजारात पत वाढविण्यासाठी अहवाल सादर करते ते हमीपत्र घेऊन बँका कमिशन कमावतात.

 7)प्रवाशी धनादेश देणे -(Traveler Cheques )

  देश-विदेशात मध्ये प्रवास करताना बराच पैसा आपल्याला खेळता लागतो आणि हाच पैसा जवळ बाळगून धोक्याचे असते हीच प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन बँकांनी प्रवास करणाऱ्या प्रवासी धनादेश देतात प्रवासाला जाणारी व्यक्ती बँकेत आपली रक्कम जमा करून ची बँकेकडून प्रवासी धनादेश पुस्तिका घेते प्रवास करणारी व्यक्ती जिथे गरज असेल तिथे बँकेने सूचित केलेले बँकेत गरजेइतके रकमेचा धनादेश देऊन पैसे काढते.

 8)सुरक्षित खनांची व्यवस्था करणे (Safe Custody, Safe Volts )

 आपले मौल्यवान दागिने घरात ठेवणे धोक्याचे असतो त्यासाठी सुरक्षितपणे सांभाळण्याची जबाबदारी आपल्याकडे नसते त्यामुळे बँका सुरक्षित आहेत आणि त्यामुळे आपण आपले हे मौल्यवान वस्तू कागदपत्रे असतील बचत प्रमाणपत्र असतील शेअर असतील ते आपण बँकेत ठेवू शकतो.


 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports