Divyang Sarathi Mitra दिव्यांग सारथी अँप संपूर्ण माहिती

 आज आपण दिव्यांग सारथी या मोबाईल ॲप बद्दल माहिती पाहणार आहोत या ॲपची निर्मिती अत्यंत चांगल्या दृष्टीने केलेले असून यामुळे आपल्या दिव्यांग बंधू भावांना भगिनींना खूप अशी मोठी मदत होणार आहे. बघितलं तर दिव्यांग ही व्यक्ती तरी आपल्याला पाहायला भेटली तरी आपण म्हणतो या व्यक्तीचं कशा पद्धतीने गुजराण होत असेल किंवा कशा पद्धतीने डेली रुटीन असून याबाबत आपल्याला प्रत्येकाला काळजी वाटतं असते आणि ही काळजी आपण घेतली पाहिजेल कुठेही दिव्यांग व्यक्ती जर आपल्याला दिसली तर त्या व्यक्तीला फुल नाही फुलाची पाकळी अशी योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. दिव्यांगांच्या आपण एक मोठा पाठिंबा आधार पण होऊ शकतात ते दिव्यांगांसाठी लागणारे आपल्याला काही योजना असतील किंवा काही मदत असेल किंवा त्यांना एक गुजराण करण्यासाठी कोणती व्यवस्था असेल तर आपण आपल्याला माहिती असेल तर आपण देऊ शकतो दिव्यांगासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने या दिव्यांग सारथीमोबाईल अँप मधून आपण विविध योजना विविध व्यवसाय याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

Divyang Sarthi
Divyang Sarthi


दिव्यांग सारथी मित्र

ॲपमध्ये दिव्यांग व्यक्तींना आपली नोंदणी करुन विविध योजनांची माहिती मिळवता येईल.शासनाकडून ज्या वेगवेगळ्या सेवा सुविधा दिल्या जातात त्या मदतीची माहिती यातुन मिळणार आहे. शासनाकडून विविध सुचना संदेश विविध बदल झालेले सुचना संदेश यातून लागलीच मिळणार आहेत.

दिव्यांग सारथी नोंदणी -

दिव्यांग व्यक्तीने या अँप मध्ये साध्या सरळ सोप्या पध्दतीने आपली नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे स्वतः सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकतात. तुमच्याकडे आवश्यक अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे त्यासोबत इंटरनेटची सुविधा असणं आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीचे संपूर्ण नाव नोंदणी करू शकतात.तुम्ही ज्या गावात रहिवाशी असताल तेथील ग्रामपंचायतच नाव नोंदणी करू शकतात. दिव्यांग व्यक्तीचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांकासह तुमच्याकडे जर दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्यामधील क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. व इतर माहिती भरणे आवश्यक आहे.इतर माहिती मध्ये दिव्यांग व्यक्ती बद्दल आर्थिक वैयक्तिक माहिती दिव्यांग व्यक्तीची कागदपत्रे माहिती दिव्यांग व्यक्तीची माहिती नोंदणी झाल्यावर ती डॅशबोर्डवर दिसते. पूर्ण माहिती भरल्यानंतर समाजकल्याण अधिकारी सदर माहिती पडताळणी करुन अप्रूव्ह करतात. दिव्यांग व्यक्तीची डॅशबोर्डवरुन बँकेची, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी माहिती घेतली जाते.

योजना -दिव्यांग योजना 

1)शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण

2)स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा / कार्यशाळांमधून अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण

3)अपंग कल्याण राज्य पुरस्कार.

4)अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

या योजनेत अस्थिव्यंग अपंगांसाठी कृत्रिम साधने (कॅलिपर्स, बूट, पाठीचे जॅकेट) कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकली, मूकबधिरांना श्रवण यंत्रे, अंधांना चष्मे,पांढरी काठी इत्यादी रु. 3000/- पर्यंतचे साहित्य देण्याची योजना आहे.

5)अपंग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य.

6)अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल.

7)अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

8)मतिमंद बालगृहे अपंगांचे शिक्षण व प्रशिक्षण

9)वृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद-

योजनेचा उद्देश

वयाची 60 वर्ष पूर्ण झालेले पुरुष व 55 वर्ष पूर्ण झालेल्या महिला वृध्द, निराश्रित, अपंग पिडीतांना भोजन, निवास, आश्रय, इत्यादी सोयी-सुविधा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वृध्दाश्रमासाठी अनुदान देणे.

अनुदानित वृध्दाश्रमातील प्रवेशित वृध्दांकरीता भोजन, निवास व औषधोपचार इत्यादी करीता शासनाकडून रु. 900/- दरमहा परिरक्षण अनुदान देण्यात येते.

10)अपंग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना.

अपंगत्व संस्था

1)स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या अंध अनुदानित अपंग शाळां जिल्हा माहिती -

2)स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या अंध अनुदानित अपंग कार्यशाळांची जिल्हा माहिती 

3)स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणा-या अस्थिव्यंग अनुदानित अपंग शाळांची जिल्हा माहिती 

4)स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणारे मतिमंद बालगृह

5)शासकीय अपंग संस्थाची माहिती

6)स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या मतिमंद अनुदानित अपंग शाळांची जिल्हा माहिती 7)स्वयंसेवी संस्था मार्फत चालविण्यात येणाऱ्या मतिमंद अनुदानित अपंग कार्यशाळांची जिल्हा माहिती 

दिव्यांग महामंडळ

-महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मुंबई.

राज्यातील बेरोजगार दिव्यांग बंधू भगिनींना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे. दिव्यांग विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणे.

दिव्यांग कार्यालय -

अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

२०११ च्‍या जनगणनेनुसार महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये अपंग व्‍यक्‍तींची लोकसंख्‍या २९,५९,३९२ इतकी आहे. राज्‍याच्‍या एकुण लोकसंख्‍येपेक्षा अपंग व्‍यक्‍तींची संख्‍या २.६३ इतकी टक्‍के आहे.

         याप्रमाणे दिव्यांग सारथी मोबाइल ॲप मध्ये आपल्याला विविध माहितीचा खजिना मिळणार आहे. ही माहिती दिव्यांग व्यक्तींना पोचवणे पर्यंत आपण समर्थ होईल जर आपल्याला ही माहिती आवडली असेल किंवा तुम्हाला अजून काही दिव्यांग याबाबत अधिक माहिती असेल तर तुम्ही जरूर कमेंट्स मध्ये सांगू शकता व त्याबाबत तुम्ही तुमचं मत सुद्धा मांडू शकता. दिव्यांग याबाबतची थोडक्यात माहिती आहे सविस्तर माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण सविर माहिती देण्याचा प्रयत्न करू.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने