संत जनाबाई संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi

 संत जनाबाई संपूर्ण माहिती .Sant Janabai information in Marathi 

नमस्कार आज आपण संत जनाबाई यांच्या बाबत माहिती पाहणार आहोत संत जनाबाई अभंग गाथा संत जनाबाई अश्या विविध मोबाईल app बाबतीत मार्गदर्शनपर माहिती मिळणार आहेत वरील गाथा अँप मधीलचं आहेत अश्या विविध गाथा आपल्याला जनाबाई अभंग गाथा आपल्याला पाहायला भेटणार आहेत. अर्थ सुद्धा पाहायला भेटणार आहे. काही अर्थ वाचा पुढे

सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ॥

महाविष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥

ब्रम्हा सोपान तो झाला । भक्ता आनंद वर्षला ॥

मुक्ताबाई मूळमाया । दासी जनी लागे पायां ॥

कृपाळू निवृत्तीनाथ हे प्रत्यक्ष शिवशंकराचा अवतार आहेत. 

सख्यभावी ज्ञानेश्वर तर महाविष्णूचा अवतार आहेत. 

ब्रम्हाचे अवतार सोपानदेव असून भक्तांवर कृपेचा वर्षाव करीत आहेत. 

मुक्ताई तर साक्षात आदिमाया भगवती असून, सर्व संताविषयी दास्य भाव पत्करलेली जनी या सर्वांना वंदन करते. 

 अश्या प्रकारे अनेक गाथा आपल्याला वाचायला भेटणार आहेत. तोपर्यंत आपण आता संत जनाबाई यांचा परिचय थोडक्यात समाजावून घेऊ

 चला तर मग.

Sant Janabai information in Marathi संत जनाबाई संपूर्ण माहिती 

Sant Janabai Information In Marathi
Sant Janabai information Marathi 


Sant Janabai information in Marathi विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा।। हा अभंग आपल्या कानावर ऐकू येऊ लागला की संत नामायाची दाशी संत जनाबाई यांचा तो मधुर स्वर ओळखू येऊ लागतो. नामदेव महाराज मुळे सतसंग घडला होता.परमार्थिक गुरु ही असल्याने दळीता कांडिता तुझं गाईनं अनंता पहाटे उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या वेदना मांडण्याचा प्रयत्न श्री विठ्ठल बरोबर करत असताना आपल्याला पहायला मिळतं आहेत.

कालखंड 1265-1335 असा अंदाजे मानला जातोय. गंगाखेड येथे जनाबाई यांचा जन्म झालेला असून त्या पंढरपूर येथे नोकरीसाठी विसावल्या व विठ्ठल भक्तीत तल्लीन झाल्या.

संत जनाबाईचा जन्म :

   गोदावरी नदीकाठी वसलेले परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाईचं जन्मगांव दमा नावाच्या विठ्ठल फक्त असलेले माता करुंड यांच्या पोटी संत जनाबाई यांचा जन्म झाला.आई बाबा दोघेही विठ्ठलाचे परम भक्त असल्याने दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करत असतं. आईला देवाघरी लवकर बोलावणं आल्यामुळे संत जनाबाईला बाबाने पंढरपूर येथे संत नामदेव महाराज यांचे वडील यांच्याकडे नोकरीसं ठेवले. त्यांचे घर विठ्ठला च्या मंदिराच्या आसपास असल्याने विठ्ठल भक्ती चे वेड जनाईसं लागले. पडेल ते कामं करत असताना विठ्ठल नाम घोष सतत चालू ठेवतं असल्याने विठ्ठल संत जनाबाईसं कामात मदत करू लागतं असतं.

संत जनाबाईचे बालपण :

संत जनाबाईचे बालपण गंगाखेड येथेचं गुण्यागोविंदाने झालेलं होते.वडिलांनी त्यांना आई देवाघरी गेल्यानंतर आईविना लेकराला नामदेव महाराज यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. दामाशेठ शिंपी यांच्याकडे जनाबाई स्थिरावल्या तेंव्हापासून संत जनाबाई नामाची दाशी म्हणून ओळखू लागल्या.नामदेवांची मनोभावे विठ्ठलभक्ती, भगवंत दिसावे यासाठी त्यांनी मनःपूर्वक हृदयापासून केलेली धडपड, नामदेवाचे अभंगलेखन, सामूहिक भजन व कीर्तन याचे जनाईला जवळून दर्शन घडले.

संत जनाबाईचे आयुष्य/जिवन :-

    संत जनाबाई नामदेव यांच्या घरी नोकरी करू लागल्या. तिथे पडेल ते कामं करू लागल्या. भगवंत प्रति असलेली आर्त माया प्रेम कामं करत असताना मनोभावे एकनिष्ठ कामं करत होत्या या कामाचा त्यांना कधीही कंटाळा आलेला नव्हता कामं करता करता विठ्ठल लिन होऊन जात कामं कधी संपून जातं होते हे समजतं पण नव्हते. प्रत्येक्षात विठ्ठल कामं करू लागतं होते.जनाबाईच्या मनातील श्रेष्ठ गुरूभाव ही तिची शक्ती होती. आयुष्यभर नामदेवांच्या भक्तीमार्गाच्या पाऊलखुणांवरून प्रवास करणारी जनाबाई अखेरच्या क्षणीदेखील गुरूची सावली बनून राहिली.दळिता कांडिता तुज गाईन अनंता’असे गुरु प्रति उदगार नेहमी काढत असतं गुरु महाराज जनाईचे.श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी हे होते.परलोकीचे तारू। म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु असं मुक्ताई भावंड यांच्याप्रति बोलून जातं होते. असा जिवन प्रवास खूप खडतर संत साहित्याचा पर्व घेऊन वारसदार आपण सर्व झालेलो आहोत.

जनाबाईचे साहित्य संपदा -

अभंग - 340लिखित स्वरूपात बरेचसे शासकीय सकल संत गाथा नामदेव गाथेत समाविष्ठ मुद्रित अभंग केलेले आहेत.

भावभक्ती, श्रीविठ्ठल महिमा, नाममाहात्म्य, पंढरीमाहात्म्य, संतगौरव, उपदेश असे विषय अभ्यासले आहेत असे दिसून येतात.

स्फूट काव्य ग्रंथ -हरिश्चंद्राख्यान, प्रल्हादचरित्र, कृष्णजन्म, बाळक्रीडा, थाळीपाक, द्रौपदीस्वयंवर ग्रंथ आहेत.

ओवी संकलन -डॉ. दा. बा. भिंगारकर यांनी जनाबाईचे ४३ अप्रकाशित अभंग व १० ओव्या जुळवाजुळव म्हणजेच संकलित केलेलं आहेत.जनाबाईचे अभंगात आर्त भावभक्ती, श्रीविठ्ठल महिमा, नाममाहात्म्य, पंढरीमाहात्म्य, संतगौरव, उपदेश असे विषय आलेले दिसतात.

वात्सल्य, कोमल ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येताना पहायला मिळतं आहेत.पुढील पिढ्यानंवर उपकारचं करून ठेवले आहेत असे रसग्रहण करणारे जेष्ठ साहित्यिक ज्येष्ठ अभ्यासक "रा. चिं. ढेरे "म्हणतात.

संत कबीरजींचा चेहरा एकदम फुलला जेव्हा गोवऱ्या" विठ्ठल विठ्ठल "स्वर कानी देऊ लागले.

        संत जनाबाई यांचे अभंग संत कबीर जी यांच्या कानी येऊन गेलेले कबीरजी संत जनाबाईची भेट घेण्यासाठी पंढरीसं आले तिथे दाशी जनाई गोवऱ्या थापण्यासाठी गेली आहें असं समजलं तेंव्हा ते थेट गोपाळपुरासं पोहचले तिथं त्यांना नदीकाठी दोन स्त्रिया दिसल्या त्या दोघीही भांडण करत असताना पहायला मिळाले. संत कबीरजी त्या स्त्रियांना बोलले की जनाबाई नावाची स्त्री कोण आहे तुमच्यापैकी, दुसरी स्त्री बोलली हिचं ती चोरटी जणी, असं बोललं तेंव्हा संत कबीरजी यांना विश्वास बसला नाही कबीरजींनी विचारलं तुम्हीच जनाई आहात कां तेंव्हा हो तुम्हांला कांय अडचण असं बोलल्यावर संत तेथून निघणार तोच जनाई बोलली तुम्ही कोण कुठलं मला नाही माहिती पण आमचं एक कामं करा या गोवऱ्या वरून आमचं भांडण लागलं आहें यातील माझ्या गोवऱ्या व यांच्या गोवऱ्या ओळखून द्या, कबीरजी म्हणले सर्व सारख्याच दिसणाऱ्या गोवऱ्या आहेत तुमची गोवरी कोणती त्यांची गोवरी कोणती कसं ओळखायचं आम्ही.संत जनाबाई बोलल्या सोप्प आहें सर्व गोवऱ्या एकत्र करा आणि एक एक गोवरी कानाला लावा त्यातून विठ्ठल विठ्ठल असा स्वर ऐकू येईल ती गोवरी माझी. कबीरजी यांनी चकित होऊन सर्व एकत्र गोवऱ्या केल्या आणि एक गवरी उचलून कानाला लावली तर विठ्ठल विठ्ठल असे स्वर ऐकू येऊ लागले. गवरी वाटणी झाल्यानंतर संत कबीरजी यांना एक प्रश्न सतावत होता तो प्रश्न संत जनाबाई यांनी ओळखुन विचारलं तुम्हांला प्रश्न पडलाकी यातून आवाज कसा कांय आला थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, चकित होऊन पाहत राहिले व यातून कबीरजी यांनी स्वतःची ओळख करून दिली.

तात्पर्य -एकाग्र चित्ता असेल आणि मनात भाव असेल तर नामस्मरण ताकद सांगणारी घटना चिरंतन अशीच आहें.

    संत जनाबाईचा संसार

   संत जनाबानी आयुष्यचं पंढरपूर बनवलं संत नामदेवांच्या घरी. नामदेव दाशी म्हणून राहिलेल्या जनाईच्या वाट्याला इथं काबाडकष्ट होतेचं पण मदत केली प्रत्यक्ष विठूरायानं.साक्षात् विठ्ठल प्रकट होऊन दळण दळत असंत.संत जनाबाई यांनी चुलीवर भाकर्‍या करून विठ्ठलाला जेवू घातले होते. विठ्ठल व संत जनाबाई यांची संवाद खोली व तिथे पांघरून घेतलेली घोंगडी प्रत्यक्ष आठवणी देतीय.जातं, मडकी, गोवर्‍या,असा सगळा जनीचा संसारच जतन केलाय पंढरपूरकरांनी. वारकऱ्याचं माहेर पंढरी मध्ये जनाईचा संसार पाहुणचं परतिचा प्रवास चालू असतोय.

   जनाईच्या आठवणी जतन -

अभंग, गवळणी, ओव्यांच्या रुपात आजही संत जनाबाई खेडोपाड्यांतील घराघरांत जात्याच्या रूपात जागती बोलती आहे.आज घराघरात स्त्री जात्यावर ओवी म्हणत असतात.

काळजाचं ठाव घेणारे अभंग लिहून संत जनाबाई झाली -

आयुष्यभर मोलकरीन म्हणून कामं केलें कामं करता करता अनेक अभंग झाले तेचं काळजाचाच ठावीत जणीनं स्वतःच वेगळी ओळख करून कधी संत जनाबाई झाली.

धरिला पंढरीचा चोर-

      सावळी विठाई दीनदुबळ्यांची आई सुखदु:ख जाणून घेणारी म्हणजेच विठाई अस बोलणारी संत जनाई विठ्ठलाच्या समोर झोपडीत राहणारी एक दिवस असा उजाडला तिच्या जीवनात देवाच्या गळ्यातले पदक चोरले हा आरोप तिच्यावर सोडला मग ती म्हणते आपण सोन्यानाण्याची नव्हे तर विठुरायाची चोरी केलीय देवाला मी हृदयात बंदिस्त केल्याचे ‘धरिला पंढरीचा चोर’ या अभंग तयार झाला.

जनाबाईंची समाधी :- 

साधारण इ. स. १३५० मध्ये आषाढ मासात कृष्ण पक्षात त्रयोदशी मुहूर्त नामदेव महाराज यांनी स्वतः चा देह ठेवला.नामाची दाशी संत जनाबाई देखील आषाढ कृष्ण त्रयोदशी या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.त्याच वेळी नामयाच्या पायरीवर विसावून पांडुरंग चरणी विलीन झालेली आढळून येतात.संत झालेल्या जनाबाई यांची जन्मगावी गंगाखेड येथे गावकरी यांनी समाधी बांधलेली आहे. दर वर्षी येथून पालखी पंढरपूरला जाते. जणीचा संसार आपल्याला पहायला मिळतोय.जनाबाई दळण दळताना जातं ओढताना भगवंत मूर्ती इथं दिसते. घरकामांत मदत करणारा विठूराया भिंतीवरील चित्रांमध्ये आपल्याला पहायला मिळतात दासी जनी संत कबीरजी यांनी कौतुकाचा क्षण पण पहायला मिळतोय. नामाची दाशी संत जनाबाई होऊन आज प्रत्येक घराघरात जिवंत आहेत.टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports