कोंबडी पालन संपूर्ण माहिती |Hen information in Marathi

 Hen information in Marathi कोंबडी पालन ची संपूर्ण माहिती आजच्या भागात आपण पाहणार आहोत. ग्रामीण भागामध्ये आर्थिक उलाढाल बऱ्याच प्रमाणात ही कोंबडी पालनमध्ये आढळून येते कुक्कुट पालन हा देशी आणि विदेशी म्हणजेच मांस उत्पादन आणि अंडी उत्पादन साठी बऱ्याच ठिकाणी केला जातो देशी कोंबडी मध्ये गिरीराज कडकनाथ अस्या परसबागेतील जाती आहेत. हातखर्च हा कोंबडी पालन वर निघला जातो. अगदी 1 कोंबडी पासून 5000 कोंबडी पर्यत तुम्ही पालन करून एक जोडव्यवसाय उभा करू शकतात.

     

कोंबडी पालन फायदे कोंबडी संपूर्ण माहिती

कोंबडी पालन संपूर्ण माहिती |Hen information in Marathi

   मूलभूत गरजा खुप प्रमाणात आपल्याला जवळच उपलब्ध आहेत. त्यामध्ये जागेची निवड शेड बांधन्यासाठी, पाण्याची सोय, विजेची सोय मुख्य रस्ता अश्या प्रकारे जोड व्यवसाय उभा करण्यासाठी भांडवल उत्पादन उभा करावे लागते. सुरुवातीला गुंतवणूक करावी लागते नंतर काही दिवसानंतर नाही गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर ती भरपूर आपल्याला नफा देऊन आपलं आर्थिक पाठबळ देऊ शकते.

कोंबडी बद्धल माहिती

   कोंबडी पालन करणे हे ग्रामीण भागातील जुना एक जोड व्यवसाय आहे. याचं व्यवसायला नवीन तंत्र वापरून एक प्रकारची व्यवसाय कल्पना देऊन चांगला प्रगती करणारा देशी कोंबडी पालन व्यवसाय करू शकतो.अंडी आणि मांस उत्पादन घेण्यासाठी सुद्धा हा कोंबडी पालन व्यवसाय करू शकतात. तलंग पक्षी अंडी देण्यासाठी सक्षम होईपर्यंत काळजी खुप छान प्रकारे घेतली जाते. नराला तुरा असतो खुप पहाटे आरवून कोंबडा बाग दिला जातो आजही पहाटे कोंबडा बाग देऊन सर्वांना टाइम्स आठवण करून देतो पूर्वीच्या काळातील एक प्रकारचे घड्याळचं होता.पक्ष्यांच्या फॅजिअ‍ॅनिडी कुळातील असुन.शास्त्रीय नाव गॅलस डोमेस्टिकस असे आहे. कोंबडा म्हणजे नर (कॉक) आणि कोंबडी म्हणजे मादी (हेन) असे म्हटले जाते.

  

 कोंबडी देशी विदेशी जाती-


देशी जाती - गिरीराज परसबागेत असणाऱ्या देशी जाती आहेत.

ज्या मांस उत्पादन असो किंवा अंडी उत्पादन असो खुप मोठ्या प्रमाणात जिथे घेतले जाते तिथे विदेशी जातींचा वापर केला जातो.

भारतात कोंबडी (कुक्कुट) संशोधनात कार्यरत संस्थांनी बहुपयोगी अशा कोंबड्यांच्या विविध जाती विकसित केलेल्या आहेत.


1)अंडी उत्पादनासाठी-प्रकल्प संचालनालय, हैदराबाद

-गिरिराज,-गिरिराज कोंबड्या वर्षाला १८० अंडी देतात.

ग्रामप्रिया


2)मांस उत्पादनासाठी


कृषिब्रो, गिरिराज.


3)मांस,तसेच अंडी उत्पादनाकरिता.

वनराज -वनराज कोंबड्या एका वर्षात साधारणपणे १४० ते १५० अंडी देतात.


कोंबडी पालन फायदे-

अंडी मांस खाण्याचे फायदे -

1) अशक्तपणा असलेल्या व्यक्तीला नेहमी अंडी उकडून खाण्याचा सल्ला दिला जातो.

2)कोंबड्यांच्या मांसापासून आणि अंड्यांपासून प्रथिने मिळतात. यांच्या मांसात मेदाचे प्रमाणही कमी असते.

3)कोंबडीच्या अंड्यातील पिवळ्या बलकात कोलेस्टेरॉल या मेदाचे प्रमाण अधिक असते. 

4) विविध लशी तयार करण्यासाठी अंड्यांचा वापर करतात. या लशींपासून माणसाचे आणि प्राण्यांचे रोगांपासून संरक्षण होते.

कुक्कटपालन व्यवसाय कसा करावा-

   कुक्कट पालन हा व्यवसाय जर व्यवसायिक पातळीवर करायचा असेल तर त्यासाठी मूलभूत गरजाचा शोध घेणे गरजेचे आहे. निवारा करणे गरजेचे आहे थंडी वाऱ्यापासून त्यांना वाचविणे गरजेचे असते. निवारा गादी पद्धत किंवा पिंजरा पद्धतीने आपण करू शकतो. खाद्य यांची गुंतवणूक 70%एकूण खर्चात येतं असते. रोग यांच्यापासून सावधानता बाळगणे खुप महत्वाचे असते.हलक्या वजन असणाऱ्या जाती -अंडी देणाऱ्या खुडूक न बसणाऱ्या जाती आहेत.

लेगहॉर्न, मिनॉर्क, आंकॉना.

कोंबडी ला होणारे रोग त्याची लक्षणे- व उपाय 

1)रानीखेत -  लक्षणे -घरघर लागणे, श्वास घेण्यास त्रास, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे.

उपाय - 'लासोटा' ही लस नाकात किंवा डोळ्यांत एक थेंब सोडावा.

2)कॉक्सीडिओसिस -

  लक्षण -

विष्टेमध्ये रक्त दिसते.

3)देवी - तुरा व डोळे मलूल होतात.

उपाय - देवी रोगप्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

4)मरेक्स - पाय लुळे पडतात.

5)गंबोरो - पातळ पांढरी हगवण लागते.

6)जंत - वाढ खुंटते, बिन कवचाची अंडी देते.

उपाय - जंताचे औषध प्रत्येक महिन्यात सतत २ ते ३ दिवस द्यावे.

निष्कर्ष-

 आजच्या लेखात आपण कुक्कट पालन व्यवसाय फायदे, रोग कोंबडी माहिती अशी माहिती घेतलेली आहे. आजच्या काळात एक व्यवसाय म्हणून कुक्कट पालन व्यवसाय ठरतं आहे  या व्यावसायिक पातळीवर अनुदानित व्यवसाय असुन याचे अनेक प्रकारे आपल्याला फायदे देखील आहे अन्न म्हणून आपण अंडी मटण याचे सेवन करत असतो.कोंबडी पालन माहिती कशी वाटली आम्हांला जरूर सांगा.

आपण ही पण माहिती घेऊ शकतात.

1)जिवनसत्व म्हणजे काय

2)घालीनं लोटांगन वंदीन चरण

3)प्राणी व त्यांचे आवाज

4)प्राणी व त्यांची घरे

5)कापूर फायदे


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Recent in Sports