Baramati Taluka information

 

     बारामती तालुका संपूर्ण माहिती Baramati Taluka Mahiti in marathi.

बारामती तालूका हे पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे वैश्विक नकाशावर नावं असणारे तालुका शहर आहे. बारामती तालुक्याची ओळखचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कृषिमंत्री मा. शरद पवार साहेब #Sharad pawar यांचे जन्मगावं असल्याने जगाच्या कानकोपऱ्यात सातासमुद्रापार पोहचलेलं आहे.बारामती तालुक्यातील काही ऐतिहासीक ठिकाण पण आहे सुपा यासारख्या ठिकाणी परगणा आढळून येतो. तसेच अष्टविनायक गणपती पैकी मोरगाव यां ठिकाणी मयुरेश्वर हे ठिकाण अतिशय प्रसिद्ध असल्यामुळे बारामती तालुक्याच्या सौन्दर्यात अजून भर पडत असल्यामुळे बारामती तालुक्याचं वैभव शैक्षणिक, औद्योगिक, सहकार यांची सुद्धा लाखमोलाची मदत तालुक्याला होतं आहे.बारामतीला 117 गावांचा सहवास लाभलेला आहे.बारामती शहराला भीमथडी या नावाने ओळखले जात होते  बारामती शहर कऱ्हा नदीकाठी वसलेले असून  याचा विस्तार खुप मोठा आहे




पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक(  PDCC Bank )
बारामती बँक,महाराष्ट्र बँक 

 शिक्षण-शैक्षणिक संस्था -

बारामती मध्ये शिक्षण सुविधा उपलब्ध झाल्यावर खुप मोठा बदल प्रत्येक कुटूंबात झालेला दिसून येतोय. शेती शिक्षण क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, IT क्षेत्र , विधी क्षेत्र ,बारामती 5 महाविद्यालय असून त्यांचा विस्तार खुप मोठ्या प्रमाणात आहे खुप मोठ्या प्रमाणात दरवर्षी विध्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात.बारामती तालुका तसेच विविध जिल्ह्यातील तसेच परराज्यातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घ्यावयास येतात. शिक्षणाच्या बाबतीत व्यवस्थापन, अभियांत्रिकी, आरोग्य, संगणक आणि माहिती व तंत्रज्ञान, कायदा, मनुष्यबळ विकास, कृषी, शास्त्र, वित्तसहाय्य, ॲनिमेशन , कला, वाणिज्य, डिझायनिंग, पाकशास्त्र, मानव्यशास्त्र, मुक्‍त शिक्षण अभ्यासक्रम यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा  अनेक सेवा सुविधा सरकारी, खासगी, एनजीओ यांच्याद्वारे उपलब्ध मोठ्या प्रमाणात होतं आहेत.
1)तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय  TC Collage --

 2)विद्यानगरी(विद्या प्रतिष्ठान)VP -Vidhya Prathisthan

माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय

शारदाबाई पवार महिला महाविद्यालय-
 कृषी विकास प्रतिष्ठान, शारदानगर येथे मुलींसाठी महाविद्यालय आहे. यालाचा शारदा संकुल असे म्हणले जात आहे.शारदानगर संकुलामध्ये प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, डे स्कूल, बेसिक ग्रॅज्युएशन, ज्युनियर कॉलेज, अ‍ॅग्री कॉलेज, बी.सी.ए, होम सायन्स, बी.व्होक.,औधोगिक प्रशिक्षण संस्था, शिक्षणशास्त्र महाविद्यालय इ. चा समावेश होतो.
के व्ही के  KVK Baramati ही शारदानगर येथे स्थित केंद्र सरकारची कृषी संस्था आहे,यामधून शेतकर्‍यांना शेतीविषयक सोयी सुविधा आधुनिक शेती माहिती, माहिती उपयुक्त सल्ला तसेच व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध होतं असते. शेती विषयक उपयुक्त औषधं रोग किडियुक्त सापळे उच्च जातिवंत रोपे उपलब्ध होताना पहायला मिळतात.
 के. व्ही. के. प्रत्येक वर्षी कृषिक प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना आधुनिक माहिती नवंनविन बदल तसेच परदेशीय भाजीपाला रोपवाटिका फळं उत्पादन यातील प्रात्यक्षिक कृती पहायला मिळण्यासाठी दरवर्षी संयुक्त विध्यमाने कृषिक प्रदर्शन आयोजीत करत असतात.कृषक प्रदर्शन मोठ्या प्रमाणात भरते महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शेतकरी येथे प्रदर्शन पाहण्यासाठी येतात .शारदाबाई पवार कृषी महाविद्यालय शारदानगर येथे असून अत्यंत प्रसिद्ध आहे

5) गव्हमेंट वैद्यकीय महविद्यालय -
ही पाच महत्त्वाची महाविद्यालये  बारामती मध्ये

 सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय सुविधा-


आरोग्य विषयक सुविधा खुप मोठ्या प्रमाणात आहेत पण प्रचार प्रसार होणं तितकंच गरजेचं आहे  ग्रामीण रुग्णालयं आहेत शहरी रुग्णालय आहेत . शहरी रुग्णालय सिल्वर ज्यूबली रुग्णालय बारामती , ग्रामीण रुई रुग्णालय म्हणून या रुग्णालय आपल्याला सेवेत रुजू आहेत सध्याच्या कठीण काळात या वैद्यकीय सेवा ने खुप मदत केलीय  खाजगी दवाखाने पण खुप आत्याधुनिक सेवेने सज्ज आहेत. बदल होतोय बदलताना आपण पाहतोय सेवा तत्पर मिळतेय खुप मोठया प्रमाणात तालुक्याला सुविधा असल्यामुळे रुग्णांचे दगवण्याचे प्रमाण खुप कमी झालेलं आहे.

 मनोरंजन-

पाहण्यासाठी स्थळ प्रेक्षनीय स्थळे.

-बारामती च्या खऱ्या वैभवाला अनेक भाविक लोक हौसी लोक एकत्र येतात आपल्या मनावरील ताण तणावं कुटूंबाला फेरफाटका तसेच अनेक प्रकारच्या माहितीसाठी  आपला दिवस आनंदाचा करतात अश्या प्रत्येक दिवसाला ही प्रेशक्षनीय स्थळ पाहण्यासाठी स्थळ अविस्मरणीय करत असतात.

Gardn गार्डन 

-पूनावाला गार्डन हे भिगवन चौक या ठिकाणी असल्याने या ठिकाणी खुप गर्दी  सायंकाळच्या वेळेला नेहमी पहावंयांस मिळतं असते. लहान मुले यांच्यासाठी विविध खेळणी उपलब्ध आहेत. वृद्ध माता-पिता, तरुण वर्ग यांचा या ठिकाणी विरंगुळा म्हणून वाढता फेरफाटका होतं असतोय येथे अनेक प्रकारचे फेरीवाले, खेळणीवाले, फास्टफूड वाले स्वतःला दोन पैसे मिळावेत या उद्धेशाने आपली दुकानें थाटत असतात..


धार्मिक स्थळे Dharmik sthale -


बारामती परिसर व बारामती ग्रामीण तालुका मिळून खुप धार्मिक स्थळाचं वरदान लाभलेले असून खुप मोठी आर्थिक उलाढाल या स्थळामुळे होतं असतेयं.
1)कटफळची जानाई देवी Katphal JanaiDevi -कटफळं गावंची जानाई देवी ही नवसाला पावणारी अशी भाविकांची ख्याती असणारी प्रसिद्ध देवी असून या देवस्थानाची यात्रा कोजागिरी पौर्णिमेच्या वेळीस मोठ्या थाटात भरली जात असते.kojagiri pornima, बारामती पासून जवळच काही अंतरावर हे ठिकाण असून या ठिकणाला येण्याची सोय बारामती बस स्टॅन्ड Baramati Bus Stand वरून बस सेवा सुरु आहे. खाजगी वाहणांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येकाच्या सोयी सुविधाने भाविक लोक येतं असतात.
2)  बिरोबा मंदिर - बारामती पासून काही अंतरावर असणारे भवानीनगर या गावापासून थोड्याच अंतरावर बिरोबा या देवस्थानचे भव्य मंदिर आपणास पाहावंयांस मिळतं असते. या देवस्थानची यात्रा जत्रा कोजागिरी पौर्णिमा या वेळेसं भरत असते या जत्रेत खुप मोठी आर्थिक उलाढाल होतं असते. महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातुन भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी येतं असतात.
3)श्री. शिरसाई देवी शिरसुफळ -शिरसाई देवीच मंदिर शिरसुफळं या ठिकाणी असून या देवीचा पण खुप मोठा उत्सव भरला जातो.

4)सिद्धेश्वर मंदिर 
5)काशीविश्वेश्वर मंदिर
6)गणपती मंदिर M.I.D.C.बारामती
7)मोरगाव गणपती मंदिर -मोरगाव या ठिकाणी मयुरेश्वर गणपती मंदिर असून हे मंदिर अष्टविनायक मंदिरातील महत्वाचं एक मानाचा ठिकाण असूनं हे महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील भारताबाहेरील भाविक या ठिकाणी येऊन भेट देत असतात . या ठिकाणी खुप मोठी आर्थिक उलाढाल तर होतं असतेच पण स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध बाराही महिने होतं असतो. 
येण्याचा मार्ग -पुणे पासून बस सेवा उपलब्ध आहे
                 बारामती पासून बस सेवा उपलब्ध आहे
                 बारामती पर्यंत मध्य रेल्वे उपलब्ध आहे.
                 बारामती पर्यंत हवाई मार्गाने सुद्धा येऊ शकतात.
ऐतिहासिक स्थळे -
सुपा Supa - या ठिकाणी सुपा परगणा प्रसिद्ध असल्यामुळे खुप किल्ले होते पण आता हे नामशेष होताना पाहायला मिळतं आहे.

चित्रपट गृह-
 बारामती परिसरात 3 चित्रपट केंद्र असून मनोरजन होताना पहायला मिळतं आहे 

उद्योग MIDC-

बारामती ला खुप मोठी औद्योगिक वसाहत लाभलेली असून परकीय गुंतवणूक खुप मोठया प्रमाणात केलेली आढळून येतेय. या ठिकाणी खुप मोठे उद्योग व्यवसाय उभे आहेत  रोजगार वाढ खुप होताना पाहायला मिळतं आहे.आपल्या बारामती मध्ये प्रथम टेस्पा या दुचाकी वाहणासाठी प्रसिद्ध आहेत .
भारत फोर्ज ,पियाजो

 रोजगार व विकासाभूमिख योजना-

रोजगारात वाढ करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे गरजेचे आहे  यानुसार रोजगार वाढ होताना पाहता येईल  योजना पारदर्शक पणे राबविल्या गेल्या पाहिजेत याचा फायदा विकासाला चालना मिळण्यासाठी होईल आणि आपला तालुका आर्थिक सक्षम होण्यासाठी सज्ज होईल.

 बारामती तालुका दारिद्र्य आणि बेरोजगारी

बारामती शहर ऐकूण 13000 कुटूंब दारिद्र्य खालील आढळून आलेले आहेत यांत अजून वाढ होताना दिसेल कारण अहवाल मध्ये कमी जास्त बदल झालेला आढळूनं येत असतोय. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब 1200+शेकडा प्रमाण 9.35 % असून हे प्रमाण शहरी भागातील असून यांत कमी जास्त बदल होऊ शकतो.ग्रामीण भागातील कुटुंब 73225 ही कुटूंब असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंब 17791 असून शेकडा प्रमाण 24.3 %आहे  हा अहवाल असून 2011च्या नुसार आहे. सर्व्ह बदल होऊ शकतो याची नोद असुद्या नेहमी बेरोजगार प्रकार दिवसेंदिवस वाढता असून यांत बदल होने गरजेचं आहे.

बारामती तालुका विविध क्षेत्रातील रोजगार विषयक -

 रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेले आढळून आलेत आहेत पण अजून रोजगारात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . पुढील रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत पण प्रशिक्षण प्रशिक्षित मनुष्यबळ स्थानिक परिसरातील असावं कारण स्थानिक जमिनी प्रत्येक प्रकल्पात गेलेल्या असतात  प्रकल्पाला गेलेल्या प्रकल्प धारक ग्रस्त व्यक्तींना कुठे आडोसा असणार आहे का ही स्तिथी पहायला मिळतं आहे.कृषी,खाणकाम ,वास्तूनिर्माण, विज, गॅस, पाणीपुरवठा, बांधकाम, घाऊक, व किरकोळ व्यापारी ,हॉटेल्स व्यवसाय, परिवहन ,गोदामे व दळणवळण वित्त पुरवठा विमा स्थावर मालमत्ता व्यापार विषयक सेवा सामूहिक सामाजिक व्यक्ती गत सेवा अश्या विविध वेगवेगळ्या सेवा माध्यमातून रोजगार उपलब्ध होताना पहायला मिळतोय पण यातून आपल्याला शेतीविषयक सेवा यासाठी अथक प्रयत्न करणे गरजेचं आहे खुप मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्र डेव्हलोपमेंट करण्याची गरज आहे  कारण 70% क्षेत्र सिंचन शिवाय असल्याने दुष्काळ स्तिथी मध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं असल्यामुळे खुप मोठा तोटा सहन करावा लागतोय. शिक्षण व्यवसाय यातून खुप मोठा बदल तर होतोय पण खुप वेळा आर्थिक बजेट कमी पडताना पहायला मिळतं आहेत .

 प्रमुख रोजगार भूमिख योजना

विकास यंत्रणा मार्फत अनेक प्रकारच्या रोजगार योजना राबविल्या जात आहेत याचा फायदा अनेक योजना धारकांना होताना पहायला मिळतं आहे. रोजगार हमी योजना असेल इंदिरा आवास योजना असेल,रोजगार हमी योजने अंतर्गत फलोउत्पादन योजना असेल, अवर्षण प्रवण योजना असेल.स्ववर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल अशा विविध रोजगार योजना राबविण्यात येतं असतात.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने